You are currently viewing संवेदना

संवेदना

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संवेदना*

~~~~~~

 

आज सभोवार भास ते अचेतनी

सांगाना , कुठे उरल्या रे जाणीवा

स्वार्थी , भोगवादीच अंमल सारा

आपुलेपणा तो कुठेही जाणवेना

 

स्मरती स्पर्श आज जन्मदात्यांचे

ते निर्मल निष्पाप कुठे जाणवेना

ऐकीवात, सारे असे ऋणानुबंधी

पण या युगीचे सत्य काय कळेना

 

इथेच भावुक प्रीतभाव आटलेले

अर्थ जाणीवांचाच कुणा कळेना

उरी सुखाच्या कल्पना मृगजळी

कृतार्थतेचा भावार्थ कुणा कळेना

 

जन्म मानवी कृतज्ञतेत जगावा

तो मुक्तीचा मार्ग कुणा जाणवेना

आज सभोवार भास ते अचेतनी

सांगाना , कुठे उरल्या रे जाणीवा

~~~~~~~~~~~~~~~~~

*©️वि.ग.सातपुते. (भावकवी )*

प्रतिक्रिया व्यक्त करा