You are currently viewing मराठी व हिंदी भाषा परीक्षा सूट मिळण्याचे आदेश लवकरात लवकर प्राप्त व्हावे

मराठी व हिंदी भाषा परीक्षा सूट मिळण्याचे आदेश लवकरात लवकर प्राप्त व्हावे

प्राथमिक शिक्षक भारतीची आग्रही मागणी

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग ने मार्च २०२१ पर्यंत १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मागवून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर प्रस्ताव सादर करताना मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेल्या आदेशाचा क्रमांक नमूद करावा, अशी अट घालण्यात आली आहे. हिंदी व मराठी भाषा सूट देण्याचे अधिकार मान. शिक्षणाधिकारी यांना आहेत. परंतू सदर आदेश शिक्षकांना अद्यापही प्राप्त झाले नसल्याने ३१ मार्च २०२१ पर्यंत १२ वर्षे झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव सादर करताना अडचणी निर्माण होणार आहेत.
म्हणूनच प्राथमिक शिक्षक सिंधुदुर्ग मार्फत हिंदी व मराठी भाषा परीक्षा सूट मिळण्याबाबत चे आदेश लवकरात लवकर प्राप्त व्हावे,अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे यांनी दिली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 6 =