*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी बापट लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझ्यापासून दूर जाताना* (माझे घर)
सगळ्यात पहिल्यांदा
तुलाच भेटले मी
10 वर्ष तुझ्याबरोबर
विश्वासाची हमी।।
रोज रोज तुझ्याशी
गप्पा मारत मारत
करायचे काम मी
घरातच रे सतत।।
जुळली तुझ्याशी नाळ
कधी ते कळले नाही
मी बोलायचे तू ऐकायचे
रिवाजच झाला जणू काही।।
बदली झाली ह्यांची
सोडावे लागणार तुला
तुझ्यापासून दूर जाताना
अश्रू आले माझ्या डोळा।।
इच्छा असूनही मी
तुला नेऊ शकत नव्हते
पण माझी सारी स्वप्ने
घरा मी तुझ्याबरोबर
जगले होते
तुझ्याबरोबरच जगले होते।।
*मानसी बापट बंगलोर*
