You are currently viewing प्रदीप जोशी यांच्या विनोदी कथेस प्रथम क्रमांक

प्रदीप जोशी यांच्या विनोदी कथेस प्रथम क्रमांक

नाशिक :

सांगली जिल्ह्यातील विटे येथील ज्येष्ठ पत्रकार व लेखक प्रदीप जोशी यांच्या गजाभाऊंचा उपवास या विनोदी कथेला हास्य धमाल नाशिक या दिवाळी अंकाने आयोजित केलेल्या विनोदी कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक जाहीर झाला असून संपादक महेंद्र देशपांडे यांनी तसे जाहीर केले आहे.

याप्रसंगी संपादक देशपांडे यांनी सांगितले की, गत् पंचवीस वर्षांपासून नाशिक येथून सातत्याने हास्य धमाल हा दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. २०२६ हे हास्य धमाल विनोदी अंकाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या विनोदी कथा स्पर्धेत प्रदीप जोशी यांच्या गजाभाऊंचा उपवास या विनोदी कथेला प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. येत्या जानेवारी महिन्यात भव्य पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येत आहे.

प्रदीप जोशी हे विटे येथील ज्येष्ठ पत्रकार व लेखक आहेत. त्यांची बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना हार्मोनियम, कॅसिओ वादन, चित्र रेखाटन, लेखन, वाचन हे छंद आहेत. यापूर्वी त्यांच्या बदल या कथेस 2021 मध्ये (कै.) वि. वा. भिडे लघुकथा पुरस्कार मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा