दोन गीर गाई आजारी; पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी गायब? पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही प्रतिसाद नाही
आंबेरी (ता. मालवण) येथील शेतकरी राजन आंबेरकर यांची तक्रार; तातडीने उपचाराची मागणी
आंबेरी (ता. मालवण)
येथील शेतकरी राजन आंबेरकर यांच्या दोन गीर गाई आजारी असून त्यांच्यावर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आंबेरकर यांनी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने जनावरांवर वेळेत उपचार मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
जनावरांची प्रकृती खालावत असताना जबाबदार यंत्रणा संपर्काबाहेर असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन पशुवैद्यकीय पथक पाठवावे आणि आजारी जनावरांवर त्वरित उपचार करावेत, अशी मागणी राजन आंबेरकर यांनी केली आहे.
