You are currently viewing शिक्षक समितीच्या वतीने जागतिक महिलादिनी कष्टकरी महिलांचा सन्मान

शिक्षक समितीच्या वतीने जागतिक महिलादिनी कष्टकरी महिलांचा सन्मान

बांदा

परराज्यातून कामानिमित्त बांदयात येऊन आपल्या कुटूंबियांसोबत मोलमोजरी करून उदरनिर्वाह करत असलेल्या ५० हून अधिक कष्टकरी महिलांचा सन्मान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सावंतवाडी शाखेमार्फत करण्यात आला.


बांदा हे ठिकाण महाराष्ट्रचे शेवटचे टोक असून या ठिकाणी कर्नाटक, उत्तरप्रदेश या राज्यातून कामानिमित्त अनेक कुटुंबे स्थलांतरित होऊन बांदा येऊन स्थायिक झालेली आहेत. या कुटुंबातील महिला देखील मिळेल ते मोलमजुरीचे काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी हातभार लावत असतात.


या कष्ट करून उदरनिर्वाहसाठी आपल्या कुटूंबियांना साथ देत असलेल्या ५० हून अधिक महिलांचा संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे शिक्षक नेते श्री नारायण नाईक यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या व या महिलांनी आपल्या मुलांना शाळेत दाखल नियमित उपस्थित ठेवावे असे सांगून या गरजू व होतकरी विद्यार्थ्यांना संघटनेच्या वतीने शैक्षणिक साहीत्य उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.
यावेळी श्री जे.डी.पाटील, प्रकाश आव्हाड,देवेंद्र अहिरे, विश्राम ठाकूर,राजाभाऊ कांगणे,गोपाळ साबळे, उर्मिला मोर्ये,भारती देसाई व स्वाती पाटील आदि संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा