You are currently viewing लावणी : चुडा

लावणी : चुडा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम लावणी*

 

*लावणी : चुडा*

 

पिचला ग बाई आज नवाकोरा चुडा

सोडा सोडा राया हात माझा सोडा l

 

हौसेने भरला होता लग्नाच्या दिवशी

हळदीची काया हिरवी बांगडी खाशी

कुठं शोधू आता वरचा नक्षीचा खडा

सोडा सोडा राया हात माझा सोडा l

 

नव्या नवरीला समजून घ्यावं जरा

जाणून तिच्या हळव्या मनाचा कोपरा

बरा नव्हं तोरा रुबाब करता केव्हढा

सोडा सोडा राया हात माझा सोडा l

 

घोटघोट रीचवा गोड अमृताचा घडा

नाजूक मनगटाला जाईल बाई तडा

रात संपली कुठं अजून धीर धरा थोडा

सोडा सोडा राया हात माझा सोडा l

 

विलास कुलकर्णी

मीरा रोड

7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा