You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी; पदभार स्वीकारला
Oplus_16908288

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी; पदभार स्वीकारला

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशानुसार नियुक्ती

सावंतवाडी / प्रतिनिधी :

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी मंगळवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यापूर्वीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदाचा प्रभारी कार्यभार बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या आदेशानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोग व मधुमेहतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विशाल रेड्डी यांची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. आदेशानुसार त्यांनी मंगळवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.

डॉ. रेड्डी हे २०१२ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या सेवेला देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुरुवात केली. त्यानंतर २०१६ मध्ये संभाजीनगर येथे वैद्यकीय उच्च शिक्षण पूर्ण केले. २०१९ मध्ये त्यांची नियुक्ती जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे झाली. सन २०२४ ते २०२५ या कालावधीत त्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सेवा बजावली. एप्रिल २०२६ मध्ये त्यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बदली झाली.

हृदयरोग व मधुमेहतज्ज्ञ म्हणून डॉ. रेड्डी यांनी मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार केले असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ आता वैद्यकीय अधीक्षक म्हणून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनासह रुग्णसेवेलाही होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा