You are currently viewing कणकवलीत अनोख्या पद्धतीने “महिला दिन” साजरा

कणकवलीत अनोख्या पद्धतीने “महिला दिन” साजरा

१०० महिलाना दिली मोफत कोरोना लस

कणकवली

आपल्या अनोख्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या समानवता ट्रस्टने संजीवनी हॉस्पिटल कणकवलीच्या सहकार्याने covid-19 ची लस १०० महिलांना मोफत देत जागतिक महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू महिलांना covid-19 च्या मोफत लसीसाठी आवाहन करण्यात आले होते. वृद्धाश्रम व महिलाश्रमातील महिलां सोबत ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 45 वर्षाच्या पुढील महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त हा लाभ देण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या प्रसूती तज्ञ डॉ. सविता तायशेटे यांचा पन्नास वर्षांच्या वैद्यकीय सेवेसाठी समानवता ट्रस्टकडून सन्मान करण्यात आला. ‘आपण या वयातही सेवावृत्तीने गर्भसंस्कार केंद्र चालू केले आहे. महिलांनी स्वतःला चांगल्या कामात गुंतवत एकमेकींना सहकार्य करत आपले जीवन समृद्ध केले पाहिजे, असे मत सत्काराला उत्तर देताना डॉ. सविता तायशेटे यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या मिताली मालवणकर, अनुष्का घाडीगावकर व व अन्य हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला समानवता ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त व कोषाध्यक्ष अरुण तायशेटे, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे, स्नेहल राणे, फ्रान्सिस फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समानवता ट्रस्टचे सचिव कमलेश गोसावी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा