You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या अध्यक्षपदी गजानन सावंत; उपाध्यक्षपदी विनोद मर्गज बिनविरोध

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या अध्यक्षपदी गजानन सावंत; उपाध्यक्षपदी विनोद मर्गज बिनविरोध

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या अध्यक्षपदी गजानन सावंत; उपाध्यक्षपदी विनोद मर्गज बिनविरोध

सन २०२६ ते २०३१ कार्यकाळासाठी पदाधिकाऱ्यांची निवड; सहकारी शिक्षण-प्रशिक्षणाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या सन २०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. गुरुवारी (दि. ३०) सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. टी. चौगुले यांनी कामकाज पाहिले.
या निवडणुकीत गजानन संभाजी सावंत यांची अध्यक्षपदी, तर विनोद रामचंद्र मर्गज यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी श्री. दळवी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन सावंत व उपाध्यक्ष विनोद मर्गज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष गजानन सावंत व उपाध्यक्ष विनोद मर्गज यांनी, जिल्ह्यातील सहकारी चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी तसेच सहकारी संस्था, सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी आणि सेवक यांना बदलत्या काळानुसार आवश्यक सहकारी शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत उपलब्ध करून दिले जाईल, अशी भूमिका मांडली.
नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये विलासराव बा. ऐनापुरे, गजानन सु. गावडे, मधुसुदन के. गावडे, सुभाष रा. तळवडेकर, केशव र. नारकर, प्रकाश मु. सावंत, सुरेश ज्ञा. चौकेकर, श्रीमती कुंदा प्र. पै आणि श्रीमती प्रज्ञा प्र. परब यांचा समावेश आहे.
यावेळी जिल्हा सहकार विकास अधिकारी मंगेश रा. पांचाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा