You are currently viewing सामाजिक शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या महिलांचा दर्शना बाबर-देसाई यांच्या हस्ते गौरव…

सामाजिक शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या महिलांचा दर्शना बाबर-देसाई यांच्या हस्ते गौरव…

राष्ट्रवादीच्यावतीने महिला दिनाचे आयोजन

सावंतवाडी

सामाजिक शैक्षणिक व विविध व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करून स्वकर्तृत्वावर यशाच शिखर गाठणाऱ्या महिलांचा सावंतवाडी तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग व सामाजिक शैक्षणिक व विविध व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करून स्वकर्तृत्वावर यशाच शिखर गाठणाऱ्या महिलांचा सावंतवाडी तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग व व्यापार विभाग महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.‌ राष्ट्रवादीच्यावतीने महिला दिनाचे औचित्व्यापार विभाग महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.‌

राष्ट्रवादीच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह देऊन हा गौरव करण्यात आला. तसेच महिलांच्या आरोग्यविषयक डॉक्टर सौ. रेवती लेले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सुशिक्षित बेरोजगार महिला व युवती यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन संदर्भात सौ. सपना पांढरे- चौडणकर, सौ. पल्लवी स्वार, महिला योगा प्रशिक्षक सौ. आदिती नाईक, सौ.‌ ऋचा पाटणकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केल. स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास संदर्भात त्यांनी प्रोत्साहन दिले. यावेळी आपला स्वतःचा व्यवसाय व कुटुंबाची जबाबदारी पेलून यशाचं शिखर गाठणाऱ्या शहरातील प्रसिद्ध उद्योजिका सौ. ऋचा पाटणकर, सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉ. सौ. दिप्ती बुवा, स्वकर्तृत्वावर स्वतःचा हॉटेल व्यवसाय सांभाळणाऱ्या सौ. विद्या बांदेकर, नजमा शैलिया, ज्येष्ठ मत्स्य विक्रेत्या पास्किन रॉड्रिक्स आदी महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, विद्यार्थी सेल संघटना जिल्हाध्यक्ष प्रतिक सावंत, हमीद शेख, महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर देसाई, शहराध्यक्ष देवा टेंमकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, अॅड. संपदा तुळसकर, जावेद शेख, हिदायतुल्ला खान, प्रसाद दळवी, राजू धारपवार, सौ. पुजा दळवी, मोहिनी देऊलकर, कांचन मसुरकर, अस्मिता वाढोकार, नवल साटेलकर, याकुब शेख, नियाज शेख, अशोक पवार, इफ्तिकार राजगुरू, स्मिता मुळीक, बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल, पुनम मराठे, सावली पाटकर, देवयानी टेमकर, सौ. फर्नांडिस, प्रज्ञा कांबळी, माधुरी वर्दम, ऐश्वर्या पिंगुळकर, मानसी गोडबोले, वैष्णवी राऊळ, अंकिता सावंत, अर्चना गाड, सिमा परब, श्रीम.प्रिती, श्रीम.स्मिता, सायली कदम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा