You are currently viewing करवंदाचा मुरब्बा

करवंदाचा मुरब्बा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ साहित्यिका सुगरण अरुणा चरपे लिखित पाककृती*

 

*करवंदाचा मुरब्बा*

 

साहित्य :-

1 वाटी करवंद

1 वाटी साखर

4विलायची

कृती :-

करवंद स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. मग चिरून चार भाग करावे आतील बिया काढून घाव्यात.

गॅसवर पॅन मध्ये करवंद व साखर घालून मंद गॅसवर चमच्याने हलवत राहावे विलायची सोलून कुटून घालावी. करवंदास पाणी सुटते त्यामुळे हवे असेल तरच पाव कप पाणी टाकावे. दीड तारी पाक येऊ दयावा. पाक घट्ट पण नको व पातळ पण नको. छान चॉकलेटी कलर आलेला असेल. गॅस बंद करावा नंतर थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा. 1 वर्षापेक्षा जास्त टिकतो. चपाती किंवा नुसताही छान लागतो.

 

अरुणा चरपे, पनवेल

*****

प्रतिक्रिया व्यक्त करा