*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी प्रा सत्यवान शांताराम घाडी लिखित अप्रतिम अंगाई गीत*
*नको चिंता आता*
***************
आयुष्यभर तू केली अमुची भलाई
नको चिंता आता नीज नीज माझ्या आई।।धृ।।
उभा जन्म तू गं राबली अमुच्यासाठी
साऱ्या वेदना त्या फक्त तुझ्याच ललाटी
तुझ्या घामाची आज खातो आम्ही मलाई
नको चिंता आता नीज नीज माझ्या आई।।धृ।।१।।
तुझ्या लेकरांचा फुलला बघ संसार
कशाची उणीव नाही आता का विचार
किती समजावू तुला कोणत्या उपायी
नको चिंता आता नीज नीज माझ्या आई।।धृ।।२।।
सात जन्मी फेडू न सके तुझे उपकार
इतुके दिलेस आम्हांसी तू धनहार
तुझीच सेवा करता पाहू दे विठाई
नको चिंता आता नीज नीज माझ्या आई।।धृ।।३।।
नको निद्रानाश सोड सगळे तू पाश
देणार नाही तुला मी होण्यास हताश
होऊन दास तुझा गातो तुला अंगाई
नको चिंता आता नीज नीज माझ्या आई।।धृ।।४।।
खाणे पिणे तुझे फक्त राहू दे ते मस्त
आरोग्यही तुझे आई असावे ते स्वस्थ
बाहेरून येता दिसावी तू ठाई ठाई
नको चिंता आता नीज नीज माझ्या आई।।धृ।।५।।
***********************************
*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.
*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
