*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ साहित्यिका सुगरण सौ.संध्या कुलकर्णी लिखित अप्रतिम पाककृती*
…..*कॉर्न टिक्की*…..
*साहित्य_:*
कॉर्न१ वाटी,२ बटाटे, त्यात मावेल तेवढे अंदाजे बेसन व बारीक रवा (ब्रेड क्रम्स नसल्याने बारीक रवा वापरलेला आहे). चवीनुसार तिखट/मिरची सैंधव मीठ, चाट मसाला,मिरे पावडर, कोथिंबीर,आलं.
*कृती_:*
बटाटे साल काढून उकडून घ्यावे. कॉर्न उकडून घ्यावे. पाणी काढून टाकावे. मिक्सरवर कॉर्न मिक्सर चालू बंद करत भरड असे वाटून घ्यावे. बटाटा खूप मऊ न शिजवता थोडासा अर्धा कच्चा ठेवून तो मिक्सरमध्ये घालून त्यातच थोडा बारीक रवा, मीठ तुम्हाला हवी असेल तर हिरवी मिरची आणि आले मिक्सर चालू बंद चालू बंद करत पेस्ट न करता वाटून वरील सर्व साहित्य मिक्स करून टिक्की चा आकार देऊन शॅलो फ्राय करून सॉस सोबत खाणे..मस्त लागतात.
संध्या कुलकर्णी
