*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुरू महिमा*
सत्यम् शिवम् सुंदरम्,
जे जे सुंदर आहे जिथे,
मी माझ्या गुरूंना पाहाते सत्वर,
प्रसन्न दर्शन त्यांचे मला होते तिथे.
गुरू वचन हे जिवनी दिपस्तंभ,
सत्कृत्याची मज जाणिव देते,
नित्य कर्तव्याचा मार्ग सांगते,
स्वधर्माचा अभिमान शिकवते.
मायबाप तसेच वृक्षवल्ली सगेसोयरे,
ग्रंथ पुस्तके पंचतत्वे,
शिक्षक सारे चराचर,
ही तर सारी त्यांचीच रूपे अपार.
देह घडवती पोसती शिकवती जिवनमुल्ये,
खुबीने जिवनास देती आकार,
घडवणारे तेच आपले शिल्पकार,
दयेचा सागर अन् ज्ञानाचे भांडार.
संकट येता धावा करता,
सावली पाठीशी मोठी होते पळभरात,
अस्तित्वाची अनुभूती मिळते,
खरोखरीच गुर माऊली मायच होते क्षणभरात.
गुरूमहिमा आहे यथार्थ,
गुरंशिवाय जिवनास नाही अर्थ,
गुरूवचन करते जीवन सार्थ,
गुरंशिवाय जिवन हे जाईल व्यर्थ.
अनुराधा जोशी.
अंधेरी मुंबई69
9820023605
