You are currently viewing मा. सभापती आपल्या दारी” कार्यक्रम घोटगेवाडी येथे उत्साहात संपन्न

मा. सभापती आपल्या दारी” कार्यक्रम घोटगेवाडी येथे उत्साहात संपन्न

“मा. सभापती आपल्या दारी” कार्यक्रम घोटगेवाडी येथे उत्साहात संपन्न*

घोटगेवाडी:

दिनांक 28/7/26,पंचायत समिती दोडामार्ग आणि ग्रामपंचायत घोटगेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित _”मा. सभापती आपल्या दारी – जनसंवाद | लोकसहभाग | विकासाचा संकल्प”_ हा कार्यक्रम दत्त मंदिर सभागृह, घोटगेवाडी येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *सौ. पार्वती महादेव गवस* – सभापती, पंचायत समिती दोडामार्ग होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून *श्री. गणेशप्रसाद गवस* – उपसभापती, पंचायत समिती दोडामार्ग उपस्थित होते.
*व्यासपीठावरील मान्यवर:*
गटविकास अधिकारी *श्री. अजिंक्य सावंत*, सहाय्यक गटविकास अधिकारी *श्री. यशवंत गवस*, जि.प. सदस्य *सौ. श्वेता धर्णे*, पं.स. सदस्य *सौ. सायली निंबाळकर, श्री. संजय सातार्डेकर, सौ. सोनिया कुबल*, जि. नियोजन सदस्य *श्री. राजेंद्र निंबाळकर*, घोटगेवाडी सरपंच *श्रीनिवास शेटकर*, उपसरपंच *सागर कर्पे*, ग्रामपंचायत अधिकारी *सुजय थेटे*, ग्रा.पं. सदस्य *विठ्ठल दळवी, नूतन पांगम* तसेच केर, मोर्ले, कोनाळकट्टा गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्वागत गीत सादर करण्यात आले. ग्रामपंचायत घोटगेवाडीच्या वतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांच्या हस्ते मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.केर गावचा सुपुत्र व घोटगेवाडी प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कौशल देसाई अग्निवीर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक *उपसभापती श्री. गणेशप्रसाद गवस* यांनी केले. त्यानंतर कोनाळ गणातील ग्रामस्थांनी आपापल्या गावातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व इतर समस्या सभापती व उपसभापती यांच्यासमोर मांडल्या. आलेल्या सर्व समस्यांची अधिकाऱ्यांसमोर खातेनिहाय चौकशी करून त्या सोडवण्याच्या सूचना उपसभापतींनी दिल्या. ग्रामस्थांनी आपली लेखी निवेदने देखील सभापतींकडे सुपूर्द केली.
*घोटगेवाडी सरपंच श्रीनिवास शेटकर* यांनी गावाच्या विकासासाठी 5 प्रमुख मागण्या मांडल्या:
1. स्मशानभूमी बांधणे
2. कोनाळकट्टा ते घोटगेवाडी 11KV जुन्या तारा बदलून केबल टाकणे
3. नळ योजनेसाठी 50,000 लि. क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे
4. घोटगेवाडी गावासाठी स्वतंत्र तलाठी सजा देणे
5. घोटगेवाडी, केर, मोर्ले, भेकुर्ली या गावांसाठी पशु वैद्यकीय दवाखाना मंजूर करणे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *मुख्याध्यापिका सौ. दिक्षा दळवी* मॅडम यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केले.
तर आभार प्रदर्शन *घोटगेवाडी उपसरपंच सागर कर्पे* यांनी केले. त्यांनी “सभापती आपल्या दारी” हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल पंचायत समिती दोडामार्गच्या सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे आभार मानले, या कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे ग्रा.पं. कर्मचारी व कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री.बाळकृष्ण मणेरीकर यांचे आभार व्यक्त केले,आणि या कार्यक्रमात ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांची पुर्तता आणि मांडलेल्या सर्व समस्यांचे निवारण होईल असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमास कोनाळ गणातील 14 गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा