*वामनराव महाडिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
कणकवली :
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरेचे माजी विद्यार्थी तथा मा. दत्तात्रय मुरारी (गुरु परुळेकर), सामान्य प्रशासन अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,सिंधुदुर्ग नगरी (ओरोस) यांनी आपल्या मातृसंस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
या उपक्रमाचा लाभ खुशी भिसे,काव्या पवार,खुशाल सावंत,हर्ष साळवी,जिया कांबळे, प्रणाली जाधव, राणी वालरे, कस्तुरी सावंत,सार्थक गुरव, सुराज गुरव,स्वयम कांबळे, विक्रांत खांडेकर,संपदा चव्हाण, हर्षद शिर्सेकर आणि देवराज जगताप या विद्यार्थ्यांना झाला.
यावेळी शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर, संतोष जठार,उमेश कदम, विद्यालयाचे माजी विद्यार्थी विजय पेडणेकर, मिनेष तळेकर, कनिष्ठ विद्यालयाचे प्रा. सचिन शेट्ये, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रशालेच्या वतीने प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी गुरु परुळेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या मातृसंस्थेतील विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांनी केलेले हे योगदान इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो.आज आपण घेतलेली छोटी प्रेरणा उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरते. त्यामुळे मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा.” असे विचार सर्व शाळा समिती सदस्यांनी सारांश रूपाने मांडले.
