You are currently viewing सिंधुदुर्ग किनारपट्टीवर उद्या ३.२ मीटर उंच लाटांचा इशारा; मच्छिमारांना सतर्कतेचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर उद्या ३.२ मीटर उंच लाटांचा इशारा; मच्छिमारांना सतर्कतेचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर उद्या ३.२ मीटर उंच लाटांचा इशारा; मच्छिमारांना सतर्कतेचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल किनारपट्टीदरम्यान बुधवार, २९ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात ३.१ ते ३.२ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने किनारपट्टी भागातील नागरिक तसेच मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्याची दखल घेत मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांना सर्व मच्छिमार आणि मच्छिमार सहकारी संस्थांपर्यंत ही माहिती तातडीने पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, समुद्रात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी व मच्छिमारांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांनी अनावश्यकपणे समुद्रकिनारी जाणे टाळावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा