*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संध्या कुलकर्णी यांची अप्रतिम रेसिपी*
*कॉर्न पकोडे*
साहित्य/कृती:
अर्धी वाटी स्वीट कॉर्न वाफवून बाजूला ठेवणे. एक वाटी स्वीट कॉर्न मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये चवीप्रमाणे हिरवी मिरची, आलं ,कढीपत्ता आवडत असेल तर कोथिंबीर हे सर्व घालून मिक्सरला अगदी पेस्ट न करता ओबडधोबड वाटून घेणे. नंतर हे सर्व भांड्यात काढून त्यामध्ये चवीनुसार तिखट ,मीठ ,जिरे, ओवा,तीळ, थोडा हिंग, हळद, आणि वाफवलेले स्वीट कॉर्न घालून सर्व मिक्स करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणे. नंतर त्यामध्ये बसेल एवढा अंदाजे तांदळाचे पीठ घालून हाताने छान मिक्स करून घेणे. पाण्याचा वापर अजिबात करू नये. त्यानंतर नेहमीप्रमाणे तेलामध्ये छान कुरकुरीत पकोडे तळून घेणे. यासोबत पुदिनाची चटणी चिंचेची चटणी किंवा सॉस याबरोबर गरम गरम पकोडे खाणे…. हे पकोडे खूप टेस्टी लागतात….*
*टीप*.. अखंड कॉर्न वाफवून घेऊनच यात घालावे. जर तसेच घातले तर जेव्हा आपण पकोडे तळत असतो त्यावेळी ते कॉर्न तेलात फुटण्याची शक्यता असते. म्हणून वाफवून घेणे… ही टीप मधुरा ताईची आहे…😊👏🤝 फक्त रेसिपी मी थोडासा फरक केलाय..😊
*सौ संध्या कुलकर्णी*…….
