ठाणे शहरातील समाजसेवक आणि चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक सेवाभावी संस्थेचे विश्वस्त श्री भैरवनाथ कृष्णा पवार हे आपल्या सातारा जिल्ह्यातील वेळे या गावी गेलेले असताना लोखंडी शिडीवरुन पडले. त्यावेळी त्यांना साताऱ्यातील शिरवळ (पुणे-बंगळुरू महामार्ग, पंढरपूर फाट्याजवळ) या ठिकाणी ॲडव्हान्स ऑर्थो हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. यावेळी डॉ. नरेंद्र वैष्णव यांनी कमीत कमी खर्चात दोन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. ग्रामीण भागात कमीत कमी खर्चात डॉ नरेंद्र वैष्णव आलेल्या रुग्णांची सेवा करत असतात आधुनिक तंत्रज्ञान वापरून अतिशय अवघड ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया डॉ. नरेंद्र वैष्णव करतात.
भैरवनाथ कृष्णा पवार हे घरात काम करत असताना शिडी वरून डाव्या बाजूला पडले. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाचा हिप जॉईट ब्रेक झाला. डॉ नरेंद्र वैष्णव यांनी आत्याधुनिक उपचार करून आर्टिफिशियल मजबूत हिप जॉईट बसवला व भुल उतरल्यावर चार तासांनी पेशंटला डॉक्टरांनी चालवले. त्यानंतर त्यांनी ब्रेक झालेल्या डाव्या हाताची शस्त्रक्रिया करून उत्तम सेवा दिली. ठाण्यासारख्या आधुनिक शहरात राहणाऱ्या पवार कुटुंबाने डॉ नरेंद्र वैष्णव यांच्यावर विश्वास ठेवून उपचारा दरम्यान सहकार्य दिले ते पाहून डॉ नरेंद्र वैष्णव यांना समाधान वाटले.
उपचारानंतर पवार कुटुंबाने डॉक्टरांशी सुसंवाद साधत मुलाखत घेतली. त्यात डॉ नरेंद्र वैष्णव यांनी सांगितले, मी गरीब ग्रामीण जनतेची शक्य होईल तितकी सेवा करतो. गरीब गरजू लोकांची परिस्थिती बघून मी अत्यल्प खर्चात त्यांना विविध प्रकारच्या सांध्यांच्या, मणक्यांच्या शस्त्रक्रिया करून देतो. पवार कुटुंबाने डॉ नरेंद्र वैष्णव यांच्या दोन-तीन रुग्णांना पाहिले. त्यांची परिस्थिती अत्यंत गरीब होती. त्यांनाही डॉ नरेंद्र वैष्णव यांनी चांगल्यात चांगले उपचार दिले. गरीब गरजू ग्रामीण जनतेची परिस्थिती बघून त्यांना उपचार देणारे हे डॉ नरेंद्र वैष्णव सर्व रुग्णांसाठी पांडुरंग होतात. आज वैद्यकीय उपचार हा पैशांचा बाजार झाला आहे. अशा परिस्थितीत हे डॉ नरेंद्र वैष्णव माणुसकीचा वैष्णव धर्म पाळत रुग्णांची सेवा करत असतात. या सेवा वृत्तीची नोंद घेऊन सर्व रुग्णांनी अपघातग्रस्त परिस्थितीत डॉ नरेंद्र वैष्णव यांच्या दैवी हातून उपचार करून घ्यावेत.
डॉ. नरेंद्र वैष्णव व त्यांचे सहकारी रुग्णसेवेकरता तत्पर असतात. अशा शब्दात पवार कुटुंबाने आपले मनोगत व्यक्त केले.
पत्रकार साहित्यिक
एडवोकेट रुपेश पवार
9930852165
