दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईला कुडाळ भाजपाचे समर्थन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे : कुणाल किनळेकर
नीट परीक्षा घोटाळा, आंदोलनावरील कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भाजपाची भूमिका निषेधार्ह; मनसे उपजिल्हाध्यक्षांचा आरोप
कुडाळ :
दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारच्या पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईला कुडाळ भाजपाने दिलेले समर्थन हे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी म्हटले आहे की, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण तसेच मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर युवकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. त्यातून कॉकरोज जनता पार्टीची स्थापना झाली असून संस्थापक अभिजीत दिपके तसेच मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले.
या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप किनळेकर यांनी केला. आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात हलविणे, तसेच आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधूर आणि रबर बुलेटचा वापर करणे, ही लोकशाहीला काळिमा फासणारी कृती असल्याचे त्यांनी म्हटले.
याच पार्श्वभूमीवर कुडाळ तालुका भाजपाने या कारवाईचे समर्थन करणे हे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या भाजपच्या नगरसेविका संध्या तेरसे यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने राजीनामा दिला असतानाही त्यांना स्थानिक भाजपकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे स्वयंप्रेरणेने सुरू झालेले असताना त्याला राजकीय रंग देण्याचा भाजपचा प्रयत्न केविलवाणा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणीही कुणाल किनळेकर यांनी केली.
*संवाद मीडिया*
*🚗🚕🏃♀️🏃🏃♂️🏃♀️🏃🏃♂️🏃♀️🏃🏃♂️🏃♀️🏃🏃♂️🚗🚕
*नोकरीची सुवर्णसंधी!**
*रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सर्वात वेगाने प्रगती करणारी
संपूर्ण स्वदेशी डिलरशिप मध्ये खालील पदे भरावयाची आहेत*.
*१) सिनिअर टेक्निशिअन -*
पात्रता – डिझेल मॅकेनिकल मधील आयटीआय(ITI )
स्थानिक गॅरेज /ऑटोमोबाईल डिलरशिप तीन वर्ष पेक्षा अधिक अनुभव
*२)असिस्टंट टेक्निशिअन-*
डिझेल मॅकेनिकल मधील आयटीआय(ITI )
स्थानिक गॅरेज /ऑटोमोबाईल डिलरशिप एक वर्ष पेक्षा अधिक अनुभव
*✅पात्रते नुसार कोकणातील सर्वोत्तम पगार*
खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
https://t.ly/pdI_1
आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
9209402525
*नवनवीन अपडेट्स करीता फॉलो करा*
https://www.instagram.com/tata_motors_spautohub_rtn?igsh=YmRyMW12amRlaGpw
https://www.facebook.com/share/p/1BrcjQvFzE/
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/209523/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
