सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कोल्हापूर येथील सचिन अडसूळ यांची सिंधुदुर्गच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुकुंद चिलवंत यांनी १९ जुलै २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. जवळपास तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती प्रभावी प्रचार-प्रसिद्धीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले.
त्यांच्या कार्यकाळात जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे तसेच विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आली. दरम्यान, त्यांच्या बदलीनंतर कोल्हापूर येथील सचिन अडसूळ यांची सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
