You are currently viewing घारपी शाळेत वृक्षारोपण करून अजित पवार यांची जयंती साजरी

घारपी शाळेत वृक्षारोपण करून अजित पवार यांची जयंती साजरी

घारपी शाळेत वृक्षारोपण करून अजित पवार यांची जयंती साजरी

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
पावसाच्या रिमझिम सरींमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने रोपे लावली. लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली. हातांनी मातीला स्पर्श करत भविष्यातील हिरव्या पर्यावरणाची बीजे रुजविल्याचे भावनिक चित्र यावेळी पाहायला मिळाले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीचा आढावा घेतला. “विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून ते जगविले, तर भविष्यातील पिढीसाठी हीच खरी संपत्ती ठरेल,” असे ते म्हणाले.
सहकारी शिक्षक धर्मराज खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक व आरोग्यदायी महत्त्व समजावून सांगितले.उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे,स्वयपाकी मदतनीस संचिता सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा