मालवण
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्पाअंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डाँ. बालाजी पाटील, पी.के.चौकेकर, अमित खोत, कृष्णा ढोलम, भूषण मेतर, एस.एस.कासले आदि उपस्थित होते.