You are currently viewing बांदा केंद्र शाळेतील सहा विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

बांदा केंद्र शाळेतील सहा विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

*बांदा केंद्र शाळेतील सहा विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड*

*बांदा*

जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेतील सहा विद्यार्थ्यांची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून जवाहर नवोदय विद्यालयात निवड होण्याची शाळेची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.चालूवर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा संपन्न झाली होती.या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वेक्षा नितिन ढेकळे,आयुष श्रीप्रसाद बांदेकर,नील नितीन बांदेकर,सान्वी संजय तायवाडे,निधी संतोष मंजिलकर,सिमरन सागर बा़ंदेकर या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
मनुष्य विकास मंत्रालयातर्फत राबविलेल्या या विद्यालयात सहावी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळते.शाळेतील विद्यार्थ्यांची दरवर्षी नवोदय विद्यालयात निवड होत असते. चालू वर्षी सहा विद्यार्थ्यांची बांदा शाळेतून निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संदीप गवस,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्षा संपदा सिध्दये, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये ,बांदा सरपंच प्रियंका नाईक यांनी अभिनंदन केले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी, रसिका मालवणकर, शांताराम असनकर ,रंगनाथ परब,जे.डी.पाटील, जागृती धुरी, मनिषा मोरे,सपना गायकवाड, स्नेहा कदम,सुजाता सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा