You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व साळगाव ग्रामपंचायत तिच्या वतीने सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये साळगाव गावचे सरपंच माननीय श्री सौ अनघा दळवी मॅडम साळगाव गावचे उपसरपंच संध्या सावंत मॅडम ग्रामपंचायत अधिकारी श्री मनोहर शेडगे सर ग्रामपंचायत सदस्य गजानन पवार उमेश धुरी बाबाजी सावंत तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम धुरी सर, स्नेह परब मॅडम जीवदानी विशेष शाळा शिक्षक, ग्रेसी मारिया सिस्टर, डॉ. एस.के. आरोस्कर सर
साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर कर्मचारी विशाखा कासले मॅडम ललित गावडे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्था कर्मचारी विशाखा कासले मॅडम यांनी संस्थेचे थोडक्यात अहवाल वाचन केले.दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला विभाग वार मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व विविध योजनांचे फायदे सांगितले. तसेच साळगाव सरपंच सौ अनघा दळवी मॅडम यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.व शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामपंचायत अधिकारी मनोहर शेडगे सर यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व या मेळाव्याचा आपण फायदा करून घ्यावा असे सांगितले.
या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांची आवश्यक साहित्य नोंदणी करण्यात आली.या मेळाव्यामध्ये शंभरहून जास्त दिव्यांग उपस्थित होते. उपस्थित दिव्यांग बांधवांना साईकृपा संस्थेच्या वतीने भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक स्कूल किट देण्यात आले.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच समाजामध्ये आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी उपस्थित यांचा आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा