You are currently viewing वाढदिवसानिमित्त अजित मठकर यांची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला ₹८ हजारांची देणगी

वाढदिवसानिमित्त अजित मठकर यांची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला ₹८ हजारांची देणगी

वाढदिवसानिमित्त अजित मठकर यांची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला ₹८ हजारांची देणगी

सेवाभावी उपक्रमांना सातत्याने मदतीचा हात; प्रतिष्ठानकडून व्यक्त करण्यात आले आभार

सावंतवाडी :

विरांश टूर अँड ट्रॅव्हलर्सचे मालक अजित मटकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यासाठी ₹८ हजारांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
अजित मटकर हे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांना नेहमीच सहकार्य करत असतात. त्यांच्या या योगदानाबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी त्यांचे आभार मानत, त्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे, पियुष टिळवे, रुपेश परब, चिरायू टोपले, शरद साळगावकर आणि पावलू डिसोजा उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा