You are currently viewing नगरसेवक गणेश भोगटे यांचे कुडाळ नगरपंचायती समोर ग्रामस्थांसमवेत उपोषण….

नगरसेवक गणेश भोगटे यांचे कुडाळ नगरपंचायती समोर ग्रामस्थांसमवेत उपोषण….

कुडाळ

वारंवार पाठपुरावा करून सुध्दा शिवाजी पार्क डेव्हलपर्सने केळबाईवाडीतील राऊळ घरानलगत असलेल्या ओहोळा मध्ये कोणतेही बांधकामांची परवानगी न घेता अतिक्रमण केल्याने नगरसेवक गणेश भोगटे यांचे कुडाळ नगरपंचायती समोर ग्रामस्थांसमवेत उपोषण सुरू केले आहे.

तर 50 ते 60 रहिवाशांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची भेट घेऊनही तसेच त्यांनी 5 फेब्रुवारी पर्यत अतिक्रमण काढण्याचे आदेश देवूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर आज सकाळपासून नगरसेवक व ग्रामस्थांनी प्रशासन व सत्ताधारी यांच्या विरोधात हे हे उपोषण करण्यात सुरू आहे.

केळबाईवाडी लगत राऊळ घराशेजारी असलेल्या ओहोळा मध्ये लगतच्या डेव्हलपर्स केलेल्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामा मुळे ओहोळा अरूंद झाल्यामुळे दरवर्षी लगतच्या घरांना पुराचा धोका संभवतो व अति नुकसान होते.ते काढण्यासाठी गेली 1 वर्षे मागणी करून सुध्दा कुडाळ नगरपंचायत प्रशासन हेतु पुर्वक टाळाटाळ करीत आहे. त्यांच्या विरोधात स्थानिक नगरसेवक गणेश भोगटे यांच्यासह ग्रामस्थ राजन राऊळ,नारायण राऊळ,महेश राऊळ,अनिल नाईक,हेमंत कोंडसकर, संदेश सावंत,समीर पाटकर,प्रसाद वाडयेकर, स्वप्निल सावंत, बाळकृष्ण राऊळ, नितीन पाटकर,अनिकेत राऊळ आदि ग्रामस्थांनी कुडाळ नगरपंचायतीच्या समोर आजपासून उपोषण सुरू केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा