You are currently viewing स्री शक्ती — सावर जरा

स्री शक्ती — सावर जरा

स्री शक्ती

सावर जरा

भास की आभास हा,ही वाट मळलेली
सावर जरा तुज जग रीत कुठे कळलेली

शिकली सवरली,म्हणतील पुढारलेली
घेतील समजून जरी तू परखड बोलली
नको विचारू प्रश्न,उत्तरे आधीच ठरलेली
सावर जरा तुज जग रीत कुठे कळलेली

पूजा अर्चना आरती करून तिला पुजतील
आजीवन झिजली की चंदन उपमा देतील
लेक वाचवा अभियान,हत्या कुठे रोखली
सावर जरा तुज जग रीत कुठे कळलेली

तुला जन्मतःच म्हणतील ते धनाची पेटी
देतील मनातून शिव्या,उगी धाडली पोटी
मुक्ता स्वतंत्र देवी तरीही बंधने ठरलेली
सावर जरा तुज जग रीत कुठे कळलेली

विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664
vilaskulkarni1967@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − nine =