माझंही एक मन आहे
जे मात्र तुझ्यासाठी झुरतं
पाखरांच्या थव्यामध्येही ते
फक्त तुला शोधत फिरतं
माझंही एक मन आहे
जे गालातल्या गालात हसतं
आठवून तुझं एक स्मितहास्य ते
मनाच्या एका कोपऱ्यातहि खुलतं
माझंही एक मन आहे
जे स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलतं
तुझ्या एका सुखासाठी ते
वसंतात नव्हे, ग्रीष्मातही फुलतं
माझंही एक मन आहे
जे सदा तुझ्या आठवणीत रमत
तुझ्या हळुवार स्पर्शाच्या स्मृतीने ते
आपुले सर्वांग रोमांचित करतं
माझंही एक मन आहे
जे फुलपाखरू होऊन घिरट्या घालतं
मलाही समजत नाही त्याने
तुझ्या भोवती फिरलेलं तुला चालतं?
खरंच माझंही एक मन आहे…..
स्वच्छंदी…
दिपी….!