You are currently viewing आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, केक कापून वृक्षवाटपाचा कार्यक्रम
Oplus_16908288

आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, केक कापून वृक्षवाटपाचा कार्यक्रम

पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे संजू परब यांचे आवाहन

सावंतवाडी :

सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याअंतर्गत सकाळी ठीक ९ वाजता उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्यानंतर सकाळी ठीक ११ वाजता आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थितांना वृक्षवाटपाचाही कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमांना शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा