You are currently viewing आम. दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप

आम. दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप

शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामाजिक उपक्रम; नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

सावंतवाडी :

सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख व नगरसेवक ॲड. नीता सावंत कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, अजय गोंदावळे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, शैलेश मेस्त्री, सुनील नाईक, हर्षा जाधव, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, भारती परब, राजश्री निर्गुण, निलम कुमठेकर आदींसह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा