You are currently viewing मैत्री चंद्र श्रीफळ

मैत्री चंद्र श्रीफळ

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मैत्री चंद्र श्रीफळ*

 

राखाडी नीळसर आकाशी

रंगबावरे चंद्रबिंब पाहुनी,

माडालावाटे खेळावे रंगाशी

रंगदेखणे रुपडे सजवुनी.

 

उंच उभारित झावळपिसारा

गप्पा मारे स्वखुशीत संगती,

चांदोबासंगे करीत घनमैत्री

धरतीवरच्या गमती जमती.

 

चंद्रालाही मग करमेना रात्री

रम्य कहाण्या आकाशीच्या,

रोज बदलते त्याचे नवेरुपडे

कथासांगे माडास नवलाईच्या.

 

कधी बारा कथा दर महिन्याच्या

भयाण काळोख्या अमवास्येच्या,

महती त्यांची असे नित वेगवेगळी

कधी दुधाळ कोजागिरी पौर्णिमेच्या

 

नवरंगी नारळीलाही आठवती दिन

महत्व काय असे नारळपोफळीचे,

वसुंधरेवरील माहात्म्य श्रीफळाचे

वैशिष्ट्य सांगे ती नारळी पौर्णिमेचे.

 

 

स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर,

कलाशिक्षिका.

प्रतिक्रिया व्यक्त करा