You are currently viewing कवयित्री कुमुदिनी मधाळे यांना ‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान 

कवयित्री कुमुदिनी मधाळे यांना ‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान 

कोल्हापूर / कागल (प्रतिनिधी) :

कागल येथील ज्येष्ठ कवयित्री, गीतकार कुमुदिनी मधाळे यांना पुणे येथील पत्रकार भवनात विशेष समाज कल्याण परिषद आणि हिंदुस्थान बुक ऑफ टॅलेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदर्श माता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवरायांचे शिलेदार येसाजी कंक यांचे वारसदार सिद्धार्थ कंक आणि अभिनेते अजय तापकीर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ कवयित्री कुमुदिनी मधाळे यांनी १९८१-८२ पासून लेखन क्षेत्रात सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कविता, लेख आणि गीते विविध दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी मराठी व हिंदी गीतलेखन, पटकथा, बुद्ध-भीमगीते तसेच सामाजिक विषयांवरील साहित्य निर्मिती केली आहे. त्यांच्या अनेक गीतांना यूट्यूबवरही मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

‘कुमुदिनी’ हा त्यांचा काव्यसंग्रह २०१९ मध्ये प्रकाशित झाला असून बळीराजा, गाव पांढरी, गेट टुगेदर या लघुपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. बळीराजा या लघुपटातील ‘आई’च्या भूमिकेसाठी त्यांना जळगाव फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला आहे.

साहित्य, कला आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री कुमुदिनी मधाळे यांना नुकताच आदर्श माता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा