You are currently viewing भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या राज्य कार्यकारणी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भरत चव्हाण यांचे अभिनंदन

भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या राज्य कार्यकारणी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भरत चव्हाण यांचे अभिनंदन

*भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या राज्य कार्यकारणी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भरत चव्हाण यांचे अभिनंदन !!!*

वेंगुर्ला

दिनांक १४ जुलै रोजी वेंगुर्ला आगारात वृक्षारोपण कार्यक्रम वेंगुर्ला नगराध्यक्ष श्री राजन गिरप साहेब, उपनगराध्यक्ष श्री सुहास गवंडळकर साहेब तसेच सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना देसाई साहेब, वेंगुर्ला आगार व्यवस्थापक श्री नवज्योत गावडे साहेब, तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री अजित कदम यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला, या वेळी आटपाडी येथे झालेल्या बैठकीत सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे अध्यक्ष तथा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर साहेब व सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ राज्य सरचिटणीस श्री सतीशजी मेटकरी साहेब यांनी सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय सचिव श्री भरत सीताराम चव्हाण यांची निवड राज्य कार्यकारणी उपाध्यक्ष पदी करण्यात आली त्या निमित्ताने नगराध्यक्ष श्री गिरप साहेब, यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, या वेळी, वेंगुर्ला आगार सचिव श्री महादेव भगत, श्री भाऊ सावळ , नगरसेवक रविंद्र शिरसाठ , नगरसेविका गौरी माईणकर इतर पदाधिकारी सभासद उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा