You are currently viewing लघु पाटबंधारे विभागाचा व्हाईट पेपर जाहीर करा; आमदार निलेश राणेंची मागणी

लघु पाटबंधारे विभागाचा व्हाईट पेपर जाहीर करा; आमदार निलेश राणेंची मागणी

लघु पाटबंधारे विभागाचा व्हाईट पेपर जाहीर करा; आमदार निलेश राणेंची मागणी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कामकाजावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह; पालकमंत्री नितेश राणेंचे चौकशी व व्हाईट पेपर सादर करण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर आमदार निलेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विभागाचा संपूर्ण व्हाईट पेपर जाहीर करण्याची मागणी केली. विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा प्रत्यक्ष परिणाम दिसून येत नसल्याची टीका करत त्यांनी या कामांची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
बैठकीत बोलताना आमदार राणे यांनी, “कोल्हापूर टाईप बंधारे नेमके काय आहेत आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा किती झाला?” असा सवाल उपस्थित केला. लघु पाटबंधारे विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या योजनांची वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी विभागाचा व्हाईट पेपर प्रसिद्ध करावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेत संबंधित विषयात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. तसेच, लघु पाटबंधारे विभागाच्या कामांचा सविस्तर व्हाईट पेपर तयार करून सादर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे या विभागाच्या कामकाजाची सखोल छाननी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा