You are currently viewing इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत पाऊसगीतांच्या सांगीतिक मैफलीत श्रोते चिंब

इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत पाऊसगीतांच्या सांगीतिक मैफलीत श्रोते चिंब

*इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत पाऊसगीतांच्या सांगीतिक मैफलीत श्रोते चिंब*

पिंपरी

पावसाने तीन दिवसांपासून दडी मारली असली तरी इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल!’ या सांगीतिक मालिकेच्या अंतर्गत ‘रिमझिम गिरे सावन…’ या नि:शुल्क ६० व्या हीरक महोत्सवी पाऊसगीतांच्या सांगीतिक मैफलीत मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील रसिक श्रोते चिंब भिजले. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड आणि पुणे परिसरातील संगीत श्रेत्रातील विविध तंत्रज्ञ, गायक कलाकार, समाजातील मान्यवर आणि रसिक श्रोत्यांची सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. राखी झोपे यांची संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या निर्मितीतून साकार झालेल्या ‘रिमझिम गिरे सावन…’ या मैफलीसाठी रंगमंचावर रंगीबेरंगी छत्र्या आणि पावसात धमाल करणाऱ्या लहान मुलांचे आकर्षक कटआउट्स मांडून वातावरणनिर्मिती करण्यात आली होती.

इंडियन म्युझिकल क्लब अर्थातच आय. एम. सी. च्या या पाऊसगीतांच्या धुंद मैफलीत अमित पांचाळ, कविता शाह, मनीषा जोशी, अभय चिद्री, स्वाती केसकर, ज्योती तेरवाडकर, श्रेया महाबळेश्वरकर, किरण मगनानी, स्वप्निल शेठ, सोनल वाणी, प्रमोद शर्मा, नयना कालकर, पंकज श्रीवास्तव, डाॅ. उल्का ठाकूर, डाॅ. राजेंद्र बर्गे, डाॅ. वैशाली सोनवणे, श्रीया दास, अनिल झोपे या गायक कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून श्रोत्यांची मने जिंकून घेतली. संगीताच्या माध्यमातून समाजाला निखळ आनंदाची अनुभूती मिळावी; तसेच समाजातील हौशी अन् नवोदित गायक कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशातून कार्यरत असलेल्या आय. एम. सी. ने आपल्या वैविध्यपूर्ण सांगीतिक संकल्पनांची परंपरा कायम राखून ‘ऋतू हिरवा…’ , ‘कधी तू रिमझिम…’ , ‘ये रे घना…’ , ‘बरखा बैरन…’ , ‘हाय हाय ये मजबुरी…’ , ‘कजरा लगा के…’ , ‘छोटीसी कहानीसी…’ , ‘भीगा बदन…’ , ‘रिमझिम के गीत…’ , ‘आज रपट जाये तो…’ , ‘सावन में मोरनी…’ , ‘रिमझिम रुमझुम…’ , ‘क्या मौसम आया हैं…’ , ‘रिमझिम गिरे सावन…’ , ‘भिगी भिगी रातों में…’ , ‘बादल यू गरजता हैं…’ , ‘साँसों को साँसों से…’ , ‘रूप तेरा मस्ताना…’ , ‘मेघा रे मेघा रे…’ , ‘आय लव यू…’ , ‘हाय रे हाय…’ , ‘कोई लडकी हैं…’ , ‘ये मौसम का जादू…’ , ‘मेरे ख्वाबों में…’ , ‘जो हाल दिल का…’ , ‘टिप टिप बरसा पानी…’ , ‘तुमसा कोई प्यारा…’ अशा एकल आणि युगुलस्वरातील मराठी आणि हिंदी गीतांनी उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या अन् अनेकदा वन्स मोअर मिळवून कळसाध्याय गाठलेल्या या मैफलीचा समारोप ‘पर्बतसे काली घटा…’ या श्रवणीय गीताने केला.

कार्यक्रमादरम्यान आय एम सीच्या संजय वाघचौरे यांच्या सुविद्य पत्नीच्या दुःखद निधनाबद्दल संपूर्ण समूहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विक्रम क्रिएशन्सने दृकश्राव्यचित्रण केले. म्युझिक व्हिजनने ध्वनिसंयोजन केले. संजय वाघचौरे यांनी छायाचित्रण केले. आय एम सीचे दीपक निस्ताने, धनश्री भोळे, विभावरी पाटील, निखिल वाणी, कल्याणी नलगे आणि प्रशांत चौधरी यांनी संयोजन आणि रंगमंच व्यवस्थेची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. शलाका नायर यांनी खुसखुशीत शैलीतून मैफलीचे निवेदन केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

_________________________
*संवाद मीडिया*

*रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे*

*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी* मध्ये *नर्सिंग* क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी

*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.*(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष *2026-2027*

🔸 *कोर्सचे नांव-

💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*

•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*

•Eligibility- 12th Pass Any Stream

• Duration : 3 Years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*

*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*
*संधी* –

🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*

*पत्ता:*
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612

*📞 संपर्क:*

*9960906947 / 9422620047*

कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204123/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा