खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा सुविधा
टेराफ्लेक्स मॅट व क्रीडा साहित्याचे लोकार्पण
पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्ट तसेच विविध खेळांसाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. या साहित्याचा लोकार्पण सोहळा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा क्रीडा संकूल बॅडमिंटन हॉल येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
जिल्ह्यातील खेळाडू यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी व सन २०२६-२७ या वर्षात होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा, खेळाडू व नागरिकांना अद्यायवत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक बॅडमिंटन टेराफ्लेक्स कोर्ट तयार करण्यात आलेले आहे. तसेच आगामी वर्षात होणाऱ्या क्रीडा स्पर्धांना साहित्याची कमतरता लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांचे मान्यता प्राप्त कबड्डी मॅट, कुस्ती मॅट, तायक्वांदो मॅट, हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, मैदानी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, जलतरण इत्यादी खेळाचे सरावाकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीस उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचा सराव स्थानिक पातळीवर करण्यास उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
