You are currently viewing सहकारी सेवा सोसायट्यांनी कामासाठी प्रस्ताव 17 जुलैपर्यंत सादर करावेत

सहकारी सेवा सोसायट्यांनी कामासाठी प्रस्ताव 17 जुलैपर्यंत सादर करावेत

सहकारी सेवा सोसायट्यांनी कामासाठी प्रस्ताव 17 जुलैपर्यंत सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी

 बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने 10 लाख रुपये इतक्या रकमेची कामे विना निविदा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर कामवाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्र प्राप्त झाली आहेत. ज्या सेवा सोसायट्यांना या कार्यालयाचे शिफारस पत्र घेऊन नोंदणी झाल्या आहे. अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे आपले प्रस्ताव व दरपत्रक दिनांक 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय येथे सादर करावेत. सोबत अटी व शर्तीची पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा