सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल वेंगुर्ला चा विद्यार्थी दुर्वांक रामचंद्र मालवणकर ग्रामीण सर्वसाधारण प्रवर्गात प्रथम
वेंगुर्ले
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इयत्ता ८ वी) ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यामध्ये वेंगुर्ला येथील *सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल’चा* विद्यार्थी *दुर्वांक रामचंद्र मालवणकर* याने ग्रामीण सर्वसाधारण प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्याने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,सचिव दत्तात्रय परुळेकर, संचालक प्रशांत नेरुरकर यांनी त्याचे विशेष कौतुक केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दुर्वांकचे अभिनंदन करून त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
