फोंडाघाट बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत नव्याने रुजू झालेल्या डॉ. रवी यांचे स्वागत
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्याकडून सत्कार; माजी शाखाधिकारी गायकवाड यांनीही व्यक्त केल्या शुभेच्छा
फोंडाघाट :
बँक ऑफ महाराष्ट्रच्या फोंडाघाट शाखेत नव्याने रुजू झालेले शाखाधिकारी डॉ. रवी यांचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.
यावेळी कट्टा शाखेत बदली झालेले माजी शाखाधिकारी श्री. गायकवाड हेही उपस्थित होते. त्यांनी डॉ. रवी यांना शुभेच्छा देताना, “कोणतीही गरज भासल्यास निःसंकोचपणे संपर्क साधा, मी मदतीसाठी नेहमी उपलब्ध राहीन,” असे सांगितले.
तसेच, फोंडाघाट शाखेसाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केलेल्या पाठपुराव्याचे गायकवाड यांनी कौतुक केले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या रत्नागिरी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून शाखेला आवश्यक स्टाफ उपलब्ध होण्यास मदत झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
