You are currently viewing सावंतवाडी पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे आमदार केसरकरांच्या हस्ते वितरण…

सावंतवाडी पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे आमदार केसरकरांच्या हस्ते वितरण…

सावंतवाडी

येथील तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विविध पुरस्कारांचे वितरण आज माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.येथील बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
यावेळी वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार युवा पत्रकार भुषण आरोसकर यांना प्रदान करण्यात आला. तर कै. चंदु वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार,ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर,माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार राजेश मोंडकर,बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार छायाचित्रकार जतिन भिसे,तर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,जिल्हा बँक संचालक विकास सावंत, व्हिक्टर डॉन्टस,तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे,अण्णा केसरकर,अँड. अनिल निरवडेकर, सिमा मठकर,पत्रकार अँड. संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, अभिमन्यू लोंढे, हर्षवर्धन धारणकर,अशोक दळवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर,सागर चव्हाण,मयूर चराठकर, दीपक गावकर, प्रवीण माजरेकर, उमेश सावंत, अनंत जाधव, रूपेश हिराप, रोहन गावडे, निखिल माळकर ,प्रसन्ना राणे,विनायक गावस,भक्ती पावसकर, प्रसन्ना गोंदावळे,योगिता बेळगावकर ,भरत केसरकर, साबाजी परब, सिद्धेश पुरलकर,यांसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्थाविक तालुकाध्यक्ष विजय देसाई,आभार खजिनादर रामचंद्र कुडाळकर, तर सुत्रसंचलन शुभम धुरी यांनी केले.दरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत तालुका अध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेंबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर,मयूर चराठकर,तसेच अन्य पत्रकार पदाधिकाऱ्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =