You are currently viewing श्री सद्गुरू मियांसाब यांचा ८९ वा पुण्यतिथी उत्सव १० जुलैला

श्री सद्गुरू मियांसाब यांचा ८९ वा पुण्यतिथी उत्सव १० जुलैला

श्री सद्गुरू मियांसाब यांचा ८९ वा पुण्यतिथी उत्सव १० जुलैला

योगिनी एकादशीनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी :

श्री सद्गुरू मियांसाब यांच्या ८९ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी योगिनी एकादशीच्या पावन दिवशी समाधीस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.
उत्सवानिमित्त सकाळी ८ ते १० या वेळेत श्री सद्गुरू पूजन, सकाळी १० ते दुपारी १२ श्रींची प्रार्थना व नामस्मरण, त्यानंतर महाप्रसाद, दुपारनंतर नामस्मरण व कीर्तन, सायंकाळी ज्ञानेश्वरी व श्री एकनाथ भागवत वाचन, तर रात्री श्रींचे भजन, हरिपाठ आणि आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी तसेच सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी या पुण्यतिथी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष वसंत गावडे-राणे, उपाध्यक्ष सतीश शिरोडकर, खजिनदार शैलेश पै, प्रसाद अरविंदेकर आणि सचिव उमेश कोरगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा