You are currently viewing महापुरुषांचे विचार आत्मसात करणे हीच आपली खरी जबाबदारी -श्री. सदानंद रावराणे

महापुरुषांचे विचार आत्मसात करणे हीच आपली खरी जबाबदारी -श्री. सदानंद रावराणे

महापुरुषांचे विचार आत्मसात करणे हीच आपली खरी जबाबदारी* -श्री. सदानंद रावराणे

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात महाराणा प्रतापसिंह आणि छ.शाहू महाराज यांची संयुक्त जयंती साजरी.

​वैभववाडी

“महापुरुषांचे विचार केवळ भाषणांपुरते किंवा पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता, ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि आचरणात आत्मसात करणे हीच आजच्या तरुण पिढीची खरी जबाबदारी आहे. देशाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर या विचारांची कास धरणे अत्यंत गरजेचे आहे,” असे प्रतिपादन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सदानंद रावराणे यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई, संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शाहू महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री.शैलेंद्र रावराणे, सहसचिव श्री. सत्यवान रावराणे, श्री.विजय रावराणे, स्थानिक समिती अध्यक्ष श्री. सज्जन काका रावराणे, प्राचार्य डॉ.के.आर .चव्हाण व कार्यालय अधीक्षक श्री.संजय रावराणे उपस्थित होते.
दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली. कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते ‘वैभवराणा’ अंकाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच ‘सिद्धिविनायक’ पुस्तकांचे वितरण करून विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी भेट देण्यात आली. यावेळी संस्कृती कांबळे आणि प्राची पांचाळ यांनी राष्ट्रभक्त महाराणा प्रतापसिंह यांच्यावर तर आकांक्षा खाडे आणि संपदा जाधव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर मनोगते व्यक्त केली.
सहसचिव श्री. विजय रावराणे यांनी आपले विचार मांडताना, महापुरुषांच्या विचारांची जाणीव प्रत्येकाला होऊन देशात एक जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. ए. कारेकर यांनी केले तर डॉ. आर. ए. भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.
_________________________
*संवाद मीडिया* 

*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*

*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*

*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*

1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*

*👇अभ्यासक्रम*

▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture

प्रवेश क्षमता- 180

*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*

www.gncamp.org

2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*

*👇अभ्यासक्रम.*

▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture

प्रवेश क्षमता- 60

*संपर्क : 8600879426 7588868705*

www.jwcagri.org

3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*

*👇अभ्यासक्रम.*

▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)

प्रवेश क्षमता- 80

*संपर्क: 9421154594 7588868705*

www.dbmcaetmp.org

*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*

*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*

https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/

https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा