You are currently viewing पावसाचा पदन्यास

पावसाचा पदन्यास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम चित्रकाव्य*

*’ पावसाचा पदन्यास ‘*

झाडे दुतर्फा रंगीत
साज खुलतो रस्त्याचा
पडणाऱ्या जलधारा
भास जाहला तळ्याचा ||

पाणी जाहले रंगीत
शोभिवंत प्रतिबिंब
वेडावुनी झेपावती
वेगे नाचणारे थेंब ||

टपटप लयबद्ध
आले नाचऱ्या अंगाने
नक्षी मोहक खुलते
जळावरी या नृत्याने ||

चित्र देखणे रेखिले
निसर्गाने सौंदर्याचे
न्याहाळीता अदाकारी
भान हरपे मनाचे ||

पावसाचा पदन्यास
मन चिंब चिंब होई
लय लाभते मनाला
आनंदाने गाणे गाई ||

*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा