You are currently viewing जाण तू जरा!रे मना!

जाण तू जरा!रे मना!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

जाण तू जरा!रे मना!

स्वप्ने सुंदर मृदुल
लेवूनिया नयनांत
पक्षासम घे भरारी
उंच उंच अंबरात.

चैतन्याची ,आनंदाची
सोनसळी बरसात
दिनमणी उगवला
ऊर्जा भर अंतरात.

जिद्द ध्येय न् ध्यासाची
आस नित्य प्रयत्नांची
फुलवावी ,तू रे मनी
हिरवाई आकांक्षांची

संकंटांना जा सामोरा
अडथळे पार करी.
उंच विहारी,रे मना!
स्वप्ने सत्य कर खरी.

शिकवण निसर्गाची
मना, तू रे! जाण जरा
समाधान आनंदाचा
चाखशील मेवा खरा.

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

_________________________
*संवाद मीडिया*

*पावसाळ्यात सांधेदुखी, अंगदुखी, पाठदुखी वाढतेय का? 🤕*

*आजच सहभागी व्हा*
*🌧️ मान्सून पंचकर्म महोत्सव*
*माधवबाग कुडाळ क्लिनिक आयोजित 🌿*

*✅ पूर्ण पंचकर्म उपचार*
*(स्नेहन + स्वेदन + बस्ती)*
*💰 फक्त ₹999/- (~₹2000/-)~*

*🎯 पंचकर्माचे फायदे:*
*✔️ सांधे व स्नायूंना आराम*
*✔️ शरीरशुद्धी*
*✔️ वातदोष नियंत्रण*
*✔️ ताणतणाव कमी*
*✔️ शरीर हलके व ताजेतवाने*

*🎁 सोबत मोफत पावसाळी आयुर्वेदिक रेसिपी पुस्तक*

*👥 फक्त 50 व्यक्तींसाठी मर्यादित*

*शिबिर कालावधी: १ जून ते 30 जून*

*📍 माधवबाग कुडाळ क्लिनिक*

*📞 नाव नोंदणीसाठी: 9371621952*

*⏳ जागा मर्यादित आहेत. आजच आपली नोंदणी करा!*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207580/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा