You are currently viewing ‘काव्यसप्तक’ काव्यसंग्रहाचे थाटामाटात प्रकाशन संपन्न

‘काव्यसप्तक’ काव्यसंग्रहाचे थाटामाटात प्रकाशन संपन्न

‘काव्यसप्तक’ काव्यसंग्रहाचे थाटामाटात प्रकाशन संपन्न

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने सोलापूर सोशल असोसिएशनच्या आर्ट्स अँड कॉमर्स सोशल महाविद्यालय, सोलापूर येथे आयोजित साहित्यिक कार्यक्रमात कवयित्री अनिसा सिकंदर शेख (दौंड) लिखित ‘काव्यसप्तक’ या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते थाटामाटात प्रकाशन संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. दस्तगीर जमादार होते. व्यासपीठावर पत्रकार, लेखक व कवी अय्युब नल्लामंदू, प्राचार्य प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी, प्रा. डॉ. शकील शेख, प्रा. बी. एच. करजगीकर, डॉ. सुरैय्या परवीन जागीरदार, समीक्षक खाजाभाई बागवान, कवयत्री तहसीन सय्यद, ज्येष्ठ साहित्यिक कवी मुबारक शेख, हसीब नदाफ तसेच लोकनायक प्रकाशनच्या प्रकाशिका सुमैय्या बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशित झालेला ‘काव्यसप्तक’ हा अनिसा सिकंदर शेख यांचा पाचवा ग्रंथ असून, त्यामध्ये कविता, गझल, चारोळी, पोवाडा लावणी, अभंग, हायकू यांसह एकूण सात साहित्यप्रकारांचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि नमुना रचना अभ्यासपूर्ण, सोप्या आणि मार्गदर्शक स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत. साहित्य क्षेत्रात नव्याने प्रवेश करणारे कवी, लेखक, विद्यार्थी तसेच वाचनप्रेमी यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

‘काव्यसप्तक’ या ग्रंथाचे प्रकाशन लोकनायक प्रकाशन यांनी केले आहे.

या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, कवी, कवयित्री, लेखक आणि वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष अजिज नदाफ, सचिव अय्युब नल्लामंदू तसेच परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.

_________________________
*संवाद मीडिया* 

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

*Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*

*Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.*

*• Duration : 4.5 Years*

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

👉 *सर्व मुलींना 100% ट्युशन फी आणि परीक्षा फी माफी.(शासन नियमानुसार)*

*पत्ता:*

*प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712*

*संपर्क:*

*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204353/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा