You are currently viewing माडखोल-धवडकी येथे आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर झाड कोसळले; वीजपुरवठा खंडित

माडखोल-धवडकी येथे आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर झाड कोसळले; वीजपुरवठा खंडित

माडखोल-धवडकी येथे आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर झाड कोसळले; वीजपुरवठा खंडित

सावंतवाडी

माडखोल-धवडकी येथे आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर सायंकाळी वादळसदृश्य वाऱ्यामुळे मोठे झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ही घटना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.
झाड कोसळल्यामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद पडली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच शेजारी असलेल्या लोहार शाळेचेही नुकसान झाले आहे. झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्याचे काम हाती घेतले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून, परिस्थितीवर संबंधित यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा