शिवसेना नेते संदेश पारकर
कणकवली
भाजी मार्केटची इमारत नगरपंचायत ने विकसित करावी ही माझी भूमिका कायम आहे. खाजगी विकासकाला भाजी मार्केट इमारत बांधकामाला 3 वर्षाची मुदत दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे नगरपंचायत ने आरक्षित जमीन ताब्यात घेऊन स्वमालकीची भाजी मार्केट इमारत बांधावी ही भूमिका आहे. नगरपंचायत आणि विकासक यांच्यातील करार वगळून इमारत बांधकाम होत नाही आहे. चुकीचे अनधिकृत बांधकाम तोडून सदर जागेत नगरपंचायत ने भाजी मार्केट इमारत बांधावी असा पुनरुच्चार पारकर यांनी केला.
3 डिसेंबर 2020 रोजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत कैफियत मांडली होती. त्यानुसार नगरसंचालक याना मंत्री शिंदे यांनी निर्देश दिल्यानुसार या चौकशीकामी नगगरचना विभागाचे असिस्टंट डायरेक्टर मिलिंद आव्हाडे यांची स्वतंत्र कमिटी नेमण्यात आली असून येत्या काही दिवसांत याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करणार आहेत अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली.