You are currently viewing डिंगणे नं.१ शाळेची पायल सावंत शिष्यवृत्तीची मानकरी

डिंगणे नं.१ शाळेची पायल सावंत शिष्यवृत्तीची मानकरी

डिंगणे नं.१शाळेची पायल सावंत शिष्यवृत्तीची मानकरी

*बांदा*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी२०२६च्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ शाळेतील कु. पायल जयेश सावंत हिने २१४ गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
जिल्हा ग्रामीण गुणवत्ता सर्वसाधारण यादीत तिने ५७ वे स्थान पटकावले.
या यशात तिचे मार्गदर्शक शिक्षक कृष्णा गावडे ,सुजित पवार,रश्मी सावंत व विश्राम ठाकर व पालकांचे मार्गदर्शन लाभले.
याचबरोबर या परीक्षेत शाळेतील रुंजी सुदर्शन सावंत,भावेश सुदन सावंत हे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती डिंगणेचे अध्यक्ष, सदस्य पालक व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी नेतर्डे केंद्राच्या केंद्रप्रमुख दीपा गवस यांनी यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा